शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींना श्रध्दांजली वाहून महासभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 19:07 IST

धुळे महापालिका, २७ आॅगस्टला आयोजन

ठळक मुद्दे-सर्वपक्षीय नगरसेवकांची वाजपेयींना श्रध्दांजली- वाजपेयींच्या जीवनकार्यावर प्रकाश-२७ आॅगस्टला होणार महासभा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे त्यांना श्रध्दांजली अर्पन करून महापालिकेची सोमवारी आयोजित महासभा तहकूब करण्यात आली़ यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले़ महापालिकेची सर्वसाधारण महासभा नवीन इमारतीतील सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती़ महासभेला महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ महासभेच्या सुरूवातीला स्व़ अटल बिहारी वाजपेयी, क्रिकेटपटू अजित वाडेकर, पद्मश्री सुवालाल बाफना व केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीतील मृतांना सामुहिक श्रध्दांजली अर्पन करण्यात आली़ यावेळी उपमहापौर उमेर अन्सारी, भाजपच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कमलेश देवरे, सोनल शिंदे, अमोल मासुळे यांनी शोकप्रस्ताव मांडत महासभा तहकूब करण्याची विनंती महापौरांना केली़ त्यानंतर अमोल मासुळे, प्रतिभा चौधरी, ईस्माईल पठाण, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, साबीर सैय्यद मोतेबर, फिरोज शेख यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली़ कोणताही भेदभाव न करता वाजपेयी यांनी केलेल्या कार्यामुळे देशवासियांना त्यांचा अभिमान होता, आहे व राहील अशा भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केल्या़ वाजपेयी यांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकत त्यांच्या कवितांनाही उजाळा देण्यात आला़ अखेर महापौर कल्पना महाले यांनी महासभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर करून सभा २७ आॅगस्टला होईल, असे स्पष्ट केले़  

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाDhuleधुळे