शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

जिल्ह्यात १,२६१ केंद्रावर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 11:36 IST

आज पल्स पोलिओ मोहीम : १ लाख ८७ हजार ८१२ बालकांना देणार लस

धुळे : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १० मार्च रोजी धुळे जिल्ह्यातील १ हजार २६१ लसीकरण केंद्रांवर पाच वर्षांच्या आतील १ लाख ८७ हजार ८१२ बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पालकांनी पाच वर्षांच्या आतील बालकांना डोस द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.पल्स पोलिओ या मोहिमे संदर्भात जिल्हा समन्वयक समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. उपस्थित होते.चारही तालुक्यांना त्यांचे लसीकरण बूथ, लाभार्थी, घरभेटीचे पथक, ट्रान्झिट टीम, मोबाईल टीमनुसार अनुदान वितरीत करण्यात आले आहे. पोलिओचे डोस देण्यासाठी बायव्हायलेट पोलिओ लस ३ लाख ६० हजार प्राप्त झाली आहे.बसस्थानक, रेल्वे स्थानक, ऊस तोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना लस देण्यासाठी ट्रान्झिट व मोबाईल पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणण्यासाठी ३हजार ३३९ कर्मचारी नियुक्त असतील. २४५ अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षण करतील. तसेच चारही तालुक्यांच्या पर्यवेक्षणासाठी ८ अधिकारी व २५ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बसस्थानक, रेल्वे स्थानक, तपासणी नाके येथे ६९ ट्रान्झिट पथके कार्यरत असतील. भटके कामगार, वीटभट्टी, ऊसतोड, रोड कामगारांच्या बालकांसाठी ८६ मोबाईल पथके कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार तालुका अधिकारी व ८२ वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे नियोजन करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे