शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

बेमोसमी पावसाने धुळे शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:09 IST

१५ मिनीटांच्या सरी : खांब वाकले, वृक्षांच्या फांद्या तुटल्या, बाजार समितीत कांद्यासह मका भिजला

धुळे : बेमोसमी पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास आलेल्या १५ मिनीटांच्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली होती़ बाजार समितीत दाखल झालेला कांदा, मका पावसात भिजल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकºयांसह व्यापाºयांना सहन करावा लागला़ एकंदरीत पाहता या पावसाने केवळ धुळ्यातच हजेरी लावली आहे़ शिंदखेडा, साक्रीसह शिरपूर तालुक्यासोबतच धुळे तालुका देखील कोरडा राहिल्याने ग्रामीण भागात शेती पिकांचे नुकसान टळले़ दरम्यान, महापालिकेच्या शाळा क्रमांक ३ मधील काही वर्गखोल्यांचे पत्रे उडाले़ सुदेवाने यात जीवितहानी झाली नाही़ २० मिमीची पावसाची नोंद करण्यात आली़  गुरुवारी सकाळपासूनच तसे ढगाळ वातावरण होते़ अचानक दुपारी दीड वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाला़ दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली़ अवघ्या काही वेळात हलक्या कोसळणाºया सरींनी रौद्र रुप धारण केले आणि पंधरा मिनीटे दमदार पावसाने हजेरी लावली़ यावेळी वाराही वाहणे तसे बंदच झाले होते़ व्यावसायिकांची धावपळदुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे हंगामी व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली होती़ भाजीपाल्यासह फळ विक्रेत्यांनी नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न केले़ तर काहींनी रस्त्याच्या अडोश्याला जाणे पसंत केले़  बाजार समितीत नुकसानधुळ्याच्या बाजार समितीत आजुबाजुच्या ग्रामीण भागासह      नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा, मका येण्यास सुरुवात झाली आहे़ गुरुवारी बाजार समितीत २ हजार ५०० गोणी कांद्याची तर १ हजार ९०० ते २ हजार गोणी मका दाखल झालेला होता़ अचानक आलेल्या पावसामुळे कांदा आणि मका वाचविण्याची धडपड शेतकºयांनी केली़ ज्या मालाची व्यापाºयांकडून खरेदी झाली होती तो माल खराब होऊ नये यासाठी व्यापाºयांनी देखील पुढाकार घेऊन कांदा आणि मका वाचविण्यासाठी पुढाकार घेतला़ या दोन्ही पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बाजार समितीच्या सुत्रांनी व्यक्त केला़ पोल वाकले, फांद्या तुटल्याबेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली़ सुरुवातीला वादळीवारा झाला नाही़ परंतु पाऊस थांबण्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार वादळीवारा झाला़ त्याचा परिणामी मालेगाव रोडवरील विद्युत पोलवर झाला़ अग्रसेन चौकाच्या पुढे रस्त्याच्या मधोमध असलेले दोन विद्युत पोल वाकल्याने विजेचा प्रवाह खंडीत करावा लागला़ विज कंपनीकडून या भागात विजेचा लंपडावकेवळ १५ मिनीटांच्या पावसात विजेचा प्रवाह खंडीत झाला होता़ वीज सारखी ये-जा करीत होती़ जिल्ह्यात कुठेही पाऊस नाहीबेमोसमी पावसाने केवळ धुळ्यातच हजेरी लावली आहे़ साक्री, पिंपळनेरसह पश्चिम पट्टा, शिरपूर शहर आणि तालुका तसेच शिंदखेडा आणि संपुर्ण तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही़ धुळे तालुक्यातील वडजाई वगळता कापडणे, सोनगीर या भागातही पावसाने हजेरी लावलेली नव्हती, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरुन दिली़ त्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे आणि घराच्या नुकसानीचा काहीही संबंध येत नाही़ 

वडजाईत वादळी वाºयासह दमदार पाऊसवडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन अवघ्या पंधरा मिनिटात तुफानी वादळी वाºयासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. त्यात गावातील अनेक झाडांच्या फांद्या, इलेक्ट्रीक तारा पोलवर पडल्यामुळे गावात आठ पोल वाकुन तारा तुटल्याने त्या घरावर पडल्या़ तर फागणे रस्त्यावरील मेन लाईनचे अनेक पोल वाकले आहेत़ त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले़ सदर नुकसानीचे वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एऩ बी. गांगुर्डे, दीपक शिरसाठ यांनी गावात तुटलेल्या तारा, पोलसह नुकसानीची पाहणी केली़ नुकसान मोठे असल्यामुळे विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे़ या वेळी गावातील संपुर्ण तारा जीर्ण झाल्या आहेत. गेल्या साठ वर्षापासुन त्या बदललेल्या नाहीत़ त्या नवीन बदलण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे