दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशीच कायम राहणार आहे.
फक्त वैद्यकीय सेवा व औषधी दुकाने नियमित सुरू राहतील. सर्व रेस्टॉरंटमध्ये रात्री ९ पर्यंत बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेमध्ये ग्राहकांना अन्न पदार्थांचे सेवन करण्यास मुभा राहील. होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
सार्वजनिक ठिकाण, मोकळे मैदान, वॉकिंग - सायकलिंग ट्रॅक पहाटे ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. शासकीय व खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. खेळ, जीम, व्यायामशाळा पहाटे ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. शूटिंग (चित्रीकरण)नियमित वेळेनुसार सुरू राहील. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळाच्या ५० टक्के क्षमतेनुसार किंवा जास्तीत जास्त १०० लोकांच्या उपस्थितीत सुरू राहतील. लग्न समारंभ जास्तीत जास्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असेल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी. उपस्थित राहणाऱ्या लोकांना ३ दिवसापूर्वीची आरटीपीसीआर, अँटिजन चाचणी केलेली आवश्यक असेल तसेच लग्न समारंभात सहभागी असणारे आचारी, वाढपी व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केलेली असणे आवश्यक असेल. लग्न समारंभावेळी प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमानबाबत कोविड संबंधित नियमांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहील.