शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना उत्पादित भाजीपाला बियाण्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज  धुळे : विनापरवाना उत्पादित केलेल्या बियाण्याची ६०९ पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील दहीवेल येथून जप्त केली. ...

लोकमत न्यूज धुळे : विनापरवाना उत्पादित केलेल्या बियाण्याची ६०९ पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील दहीवेल येथून जप्त केली. मंगळवारी केलेल्या या कारवाई प्रकरणी दिल्ली, पुणे व दहीवेल येथील मिळून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे निरीक्षक मनोजकुमार शिसोदे यांनी या प्रकरणी दहीवेल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दहीवेल येथील माहेश्वरी कृषी सेवा केंद्र येथे तपासणीदरम्यान वेलकम कापे सायनस लि.नवी दिल्ली या कंपनीचे विनापरवाना उत्पादित केलेले विविध भाजीपाला पिकाच्या बियाण्याची एकूण ६०९ पाकिटे विक्रीच्या उद्देशाने साठविलेली आढळली. हा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत २ लाख ७३ हजार ४९० रुपये एवढी आहे.या प्रकरणी कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक शिंदे (४८) रा.सर्व्हे नं.३४, चव्हाण कॉम्प्लेक्स, धनकवडी पुणे, कंपनीचे संचालक सुरेंद्र सिंग, ओमप्रकाश सिंग, रा.दिल्ली व महेंद्र प्रेमराज कलंत्री, रा.दहीवेल, ता.साक्री या चौघांविरूद्ध भादंवि कलम ४२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम व बियाणे कायद्यान्वये मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी