शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:09 IST

आयएमएची कार्यशाळा : राज्यातील ३० जिल्ह्यातीलप्रतिनिधींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इंडियन मेडीकल असोसिएन महाराष्ट्र राज्य आणि धुळे शाखेतर्फे ‘मेडीको लिगल अ‍ॅसपेक्ट’ या विषयावर आयोजित महा एमएलकॉन या डॉक्टरांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर एकमत झाले़ रविवारी दुपारी या कार्यशाळेचा समारोप झाला़या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी तसेच देशातील १३ राज्यांचे राष्ट्रीय प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चर्चासत्रात मार्गदर्शन केले़ एनएमसीच्या डॉक्टर विरोधी धोरणाच्या विरोधात जनजागृती अभियानाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला़ येत्या १२ मार्च रोजी साबरमतीला देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले़डॉ़ शिवकुमार उत्तुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतेही उपचार अथवा शस्त्रक्रीया करताना रुग्णाची संमती घेणे डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे़ शस्त्रक्रिया करताना आणखी एखादी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास त्यासाठी देखील संमती घ्यावी़ भुलतज्ज्ञांनी देखील स्वतंत्र संमती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़डॉ़ दिनेश ठाकरे यांनी शासनाशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि नोंदीबाबत मार्गदर्शन केले़ विविध शासकीय योजना, विमा, जन्म नोंद याबाबतीत डॉक्टरांनी अपडेट असले पाहिजे़ डॉ़ नवरंगे यांनी देखील डिलीजंट मॅनेजमेंट आॅफ डेथ इन हॉस्पिटल या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टरांनी कागदोपत्री सुरक्षित राहण्याच्या मुद्यावर भर दिला़डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध, रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, वैद्यकीय सेवा देत असताना अत्याधुनिक रुग्णालय व रोग मिमांसा यांची सांगड घालून पारदर्शकता आणणे आदी महत्वाच्या विषयांवर उहापोह झाला़ वाढते आजार व अपघातांमुळे रुग्णसेवा देत असताना अनेक प्रकारचे समज व गैरसमज निर्माण होतात व त्याचा परिणाम रुग्णालयांवर तसेच डॉक्टरांवर हल्ले होतात़देशभरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना कायदेशिर बाबींना सामोरे जावे लागते़ न्याय वैद्यक शास्त्राशी निगडीत अनेक समस्या निर्माण होतात़ या सर्व समस्यांवर काय उपाययोजना करता येतील या बाबतीत चर्चासत्रात देशभरातील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले़

टॅग्स :Dhuleधुळे