शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उंभर्टी पाझर तलावास गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:21 IST

परिसरातील विविध गावांमध्ये भीती, प्रशासन अलर्ट

साक्री : साक्री तालुक्यातील उंभर्टी येथील पाझर तलावाला गळती लागल्याने शेतकºयांसह गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ पाझर तलाव फुटू नये म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने तलावाच्या बाजूने पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ परंतु काही शेतकºयांनी त्याला विरोध दर्शवल्याने प्रशासन पेचात सापडले आहे़ तलाव फुटण्याच्या शक्यतेने महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने तलावाच्या खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत़ संध्याकाळपर्यंत शेतकºयांची समजूत घालण्याचे प्रयत्न प्रशासन स्तरावर सुरू होते़ अनेक वर्ष जुना असलेला हा पाझर तलाव यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे तुडुंब भरला आहे़ त्यामुळे पाझर तलावाच्या खालच्या भागातून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाला कळविण्यात आले होते़ त्यानुसार सिंचन विभागाचे अभियंते, पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे तहसीलदार संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली असता तलावाच्या खालच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले़ जास्त पाणी साचल्याने हा बंधारा फुटू  शकतो व खालच्या शेतीला व गावांना धोका निर्माण होऊ शकतो़ म्हणून तलावाच्या बाजूने जेसीबी यंत्राच्या साह्याने पाणी काढण्याची जागा तयार करण्याची सुरुवात झाली होती़ परंतु काही शेतकºयांनी त्याला विरोध दर्शवल्याने काम थांबून होते़ जर हा बंधारा खरोखर तुटला तर तलावाच्या खालील शेत जमीन वाहून जाईल या शक्यतेमुळे बंधाºयाच्या बाजूने पाणी काढल्यावर पाणी कमी होईल़ यामुळे बंधारा फुटण्याची शक्यता राहणार नाही़ यासाठी प्रशासन प्रयत्न करत होतो तसेच ज्या ठिकाणाहून पाण्याची गळती सुरू होती तेथेही मोठे दगड टाकून तात्पुरता अडथळा निर्माण करण्यात आला आहे़ तलावाच्या ज्या बाजूने पाणी काढण्याचे काम सुरू होते़ तेथे खाली खडक असल्याने त्यालाही मर्यादा आल्या आहेत़ कासारे गावातही पाणी वाढणार असल्याची दवंडी देण्यात आल्याने कासारे ग्रामस्थांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री