शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जैताण्यात दोघा तरुणांचा शेतळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:00 IST

सोमवारची घटना : ऐन दिवाळीत घडल्याने गावावर शोककळा

जैताणे : साक्री तालुक्यातील जैताणे येथील दोन युवकांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याची दुर्घटना दिवाळी पहाटच्या दिवशीच घडली़ यामुळे गावावर ऐन दिवाळीत शोककळा पसरली़ साक्री तालुक्यातील जैताणे येथील देवमन गंगाराम खलाणे यांचा मुलगा खलाणे दुग्धालयाचे संचालक मच्छिंद्र देवमन खलाणे (वय ३४) व सामाजिक कार्यकर्ते लुका पाटील यांचा मुलगा सुनील लुका जाधव (वय ३०) हे दोन्ही मित्रांसमवेत दिवाळीच्या दिवशी शेतात गेले होते. त्यादरम्यान पाय घसरुन तोल गेल्याने देवमन खलाणे यांच्या मालकीच्या शेतात असणाºया शेततलावात दोन्ही तरुण पडले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तलाव काठोकाठ भरला असल्याने तसेच शेततळ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोणाही मित्रांना त्या दोघा तरुणांना सावरता आलेले नाही. गावात निरोप पोहोचल्याने नातेवाईक शेतात पोहचले. तोपर्यंत दोन्ही मृतदेह तरंगताना दिसत होते. दोघांना जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले.पोलीस पंचनाम्याननंतर दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन जैताणे येथे करण्यात आले़ रात्री ८ वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले़ मयत मच्छिंद्र खलाणे हा परिसरातील नामांकित दुग्धव्यवसायिक होता. तर सुनील जाधव हा एक मेहनती कष्टाळू शेतकरी होता. आपआपल्या क्षेत्रात कार्यरत असतानाच सुनील जाधव उर्फ भावड्या हा प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करणारा कार्यकर्ता होता. दोन्ही युवकांचा समजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांमध्ये सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. कुठल्याही उत्सवाची कल्पना त्यांच्या शिवाय करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे़    मयत सुनील हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी राणी, मुलगी मृणाली वय ८, मुलगा हितेश वय ५ असा परिवार आहे. तर मयत मच्छींद्र यांच्याही पश्चात पत्नी  भावना मुलगी वर्षा वय ८ ,मुलगा हर्षल वय ५ असा परिवार आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी