शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

सोनगीरजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार, तीन जखमी

By admin | Updated: July 7, 2017 02:10 IST

सोनगीर : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली

लोकमत न्यूज नेटवर्क

सोनगीर :  दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक  वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली. राजस्थानहून फरशी घेऊन धुळ्याकडे येत असलेल्या  आरजे १७ - जीए ५७३७  क्रमांकाच्या ट्रकवर  वाघाडी फाट्यावर गुरुवारी पहाटे धुळ्याकडून येणारा टीएन ५२-एच ९१२३ क्रमांकाचा ट्रक समोरून येऊन धडकला. अपघातात फरशीच्या ट्रकमधील क्लिनर कमलसिंग रामप्रसाद डांगी (२४) हा फरशीखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला़,  तर दुसºया ट्रकमधील जखमी आऱ अरुणकुमार राज (२१) रा़ तामिळनाडू याचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला.तीन जखमीअपघातात पसणीबोरा किन्नकंबी (२८) रा़ भुजीनक्काम, ता़ आराघ, जि़ धर्मपुरी, तामिळनाडू, राजेश आणि राहुल कन्हैयालाल चव्हाण (२७) रा़ झिरापूर, जि़ राजगड, राजस्थान हे तिघे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ एकेरी वाहतुकीमुळे अपघातमुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी फाट्यापासून ते बाभळे फाट्यापर्यंत धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाºया रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे़ यामुळे  वाहतूक एकेरी  करण्यात आली आहे. यामुळे भरधाव वेगाने येणाºया गाड्या समोरासमोर येतात व अपघात घडतात. अपघाताचे वृत्त कळताच सोनगीर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र पाटील हे सहकाºयांसह घटनास्थळी धावले़  त्यांनी अपघातातील मृत आणि जखमींना ताबडतोब उपचारार्थ धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात पाठविले. वाहतुकीवर परिणामअपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली    होती.  घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत़