शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन न्यायाधिशांच्या घरांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:18 IST

दोंडाईचा : सराईत गुन्हेगाराचे कृत्य

दोंडाईचा : शहरातील एका सराईत गुन्हेगाराने दोन न्यायाधिशांच्या घरांवर दगडफेक करून गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. लोकांनी या गुन्हेगारास पकडून त्यास चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यास येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्की निकवाडे असे या गुन्हेगाराचे नाव आहे.निकवाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. सोमवारी ९ वाजेच्या सुमारास तो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असलेल्या परिसरात पोहचला. तेथे न्या.अण्णासाहेब गिºहे राहतात. निकवाडे याने त्यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. तसेच त्यांची गाडी असल्याचे समजून तेथे उभी असलेली दुसरीच गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निकवाडे नूतन महाविद्यालयाच्या जनता कॉलनी परिसरात पोहचला. तेथे न्या.संतोष गरड राहतात. निकवाडे याने त्यांच्या घरावरही तुफान दगडफेक केली. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.या वेळी त्याच्यासोबत असलेले अन्य दोघे जण पळून गेले. त्यांचे नाव कळू शकलेले नाही. नागरिकांनी हा प्रकार पाहताच त्यांनी निकवाडे यास पकडून चांगलाच ‘पब्लिक मार’ दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलीस तत्परतेने घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी पकडून ठेवलेल्या निकवाडे यास पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या मारामुळे जखमी झालेल्या निकवाडे यास पोलिसांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अद्याप पोलिसांत काहीही नोंद करण्यात आलेली नाही. निकवाडे याने हे कृत्य का केले, याचे कारण कळू शकलेले नाही. मात्र झाल्या प्रकाराने नागरिक भयभीत झाले असून त्याचीच चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Dhuleधुळे