शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार

By अतुल जोशी | Updated: July 12, 2023 18:33 IST

याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धुळे: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोनजण ठार व दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कंटेनरचे चाक निखळून पडल्याने दुचाकीवरील मुलगा ठारसोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एजाज मुसा बागवान (वय ५३, रा. देवपूर, धुळे) हे परिवारासह दुचाकीने जात होते. त्याचवेळी नगावबारीजवळील सातपुडा हायस्कूलसमोरील उड्डाणपुलावरून जात असलेल्या कंटेनरचे (एचआर- ३९, ई- ७१७४) एक चाक निखळून पडले. ते चाक दुभाजक ओलांडून बागवान यांच्या दुचाकीला धडकले. चाकाच्या धडकेत एजाज बागवानसह त्यांची पत्नी रिजवानबी बागवान व मुलगा शादबा हे दुचाकीच्या खाली पडल्याने जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शादबा बागवान याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. याप्रकरणी एजाज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलिस स्टेशनला कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक चिंचोलीकर करीत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठारअज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील तिसगाव ढंढाणे फाट्याजवळ ९जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. रमेश झेंडू सोनवणे (रा. धमाणे) याला शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात रमेश सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाासाठी रुग्णालयात दाखल केले असता, तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजाराम झेंडू सोनवणे यांनी ११ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिसांत अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात