शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दिनू डॉनसह दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:27 IST

स्पिरीटचा टेम्पो पकडला : दोघे फरार, बारापत्थर चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बनावट दारु बनविण्यासाठी उपयोगात येणाºया स्पिरीटने भरलेला टेम्पो शहर पोलिसांच्या पथकाने बारापत्थर चौकात शुक्रवारी दुपारी सापळा लावून पकडला़ टेम्पोसह स्पिरीट असा एकूण १ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी शिरुडच्या दिनू डॉनसह टेम्पो चालकाला अटक करण्यात आली़ तर अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत़ एमएच १८ एए ५००३ क्रमांकाचा टेम्पो शिरूड येथून धुळ्याकडे येत आहे़ यात बेकायदेशीररित्या बनावट दारु बनविण्याकामी उपयोगात येणारे स्पिरीट ठेवलेले प्लॅस्टिक ड्रम असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली़ माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, एम़ एच़ सैय्यद, नाना आखाडे, हिरालाल बैरागी, प्रकाश पाटील, मुक्तार मन्सुरी, कबीरोद्दीन शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, रविंद्र गिरासे, राहुल पाटील, तुषार मोरे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी यांनी बारापत्थर चौकात सापळा लावला होता़ दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास शिरुड गावाकडून धुळ्याकडे येणारा एमएच १८ एए ५००३ क्रमांकाचा टेम्पो दाखल होताच तो अडविण्यात आला़ चालकाची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने टेम्पोची तपासणी करण्यात आली़ टेम्पोत ४२ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर सफेद रंगाचे स्पिरीट आणि १ लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला़ याप्रकरणी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन (रा़ शिरुड ता़धुळे) आणि टेम्पो चालक सुनील महारु पाटील (रा़ नकाणे ता़ धुळे) या दोघांना अटक करण्यात आली़ तर या प्रकरणातील संशयित धनराज जितेंद्र शिरसाठ आणि सोनू उर्फ सोन्या नागराज पवार (दोघे रा़ धुळे) हे फरार झाले आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी