विहिरीत पडलेले दोन बिबटे सुखरुप, वन विभागाची यशस्वी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 10:45 PM2021-04-06T22:45:27+5:302021-04-06T22:45:38+5:30

साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजिक मोगरपाडा

Two leopards lying in the well safe, successful performance of the forest department | विहिरीत पडलेले दोन बिबटे सुखरुप, वन विभागाची यशस्वी कामगिरी

विहिरीत पडलेले दोन बिबटे सुखरुप, वन विभागाची यशस्वी कामगिरी

Next

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजिक मोगरपाडा येथील एका विहिरीत अंदाजे दोन ते अडीच वर्षाचे बिबट्या नर-मादी यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ यात कोणालाही काहीही इजा पोहचली नाही़ ग्रामस्थांनीही सहकार्य केले़

साक्री तालुक्यातील मोगरपाडा शिवारात एका विहिरीत बिबट्या नर-मादी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास पडली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना कळविण्यात आली़ लागलीच पथक पोहचले तेव्हा विहिरीजवळ बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी हटविण्यात आली़ विहिरीची पाहणी करुन दोनही बिबट्यांना बाहेर काढण्यासाठी तीन शिडी एकमेकांना बांधण्यात आली़ त्याच्या मदतीने एका बिबट्याला सकाळी ११ वाजता तर दुसºयाला दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले़ दोन्ही बिबटे जवळच असलेल्या जंगलाच्या डोंगराळ भागाकडे पळून गेले़

मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार, सहायक वनसंरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अरुण माळके, वनपाल बच्छाव, चरणमाळचे आऱ डी़ मोरे, वनरक्षक दीपक भोई, योगेश भील, देवा देसाई, काळू पवार, सुमित कुवर, सागर सूर्यवंशी, तानाजी कुवर, दिलीप पाटील यांनी दोन्ही बिबट्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळविले़

Web Title: Two leopards lying in the well safe, successful performance of the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.