शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातून दोन सोनपोत लांबविल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:12 IST

‘धूमस्टाईल’ लूट : महिलांमध्ये धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील देवपुर भागातील जयहिंद चौक व शिवपार्वती कॉलनी अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी मोेटारसायकलवरून येऊन सोनपोत हिसकावून पोबारा केल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये धास्ती व्यक्त केली जात आहे़ यातील पहिली घटना शनिवारी रात्री तर दुसरी घटना रविवारी दुपारी घडली़ देवपुरातील जयहिंद चौकाकडून विष्णू नगरकडे जाणाºया रोडवर अरिहंत मोबाईल दुकान ते पानाबाई सिताराम पाटील बालमंदिर दरम्यान शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रत्नाबाई नारायण वाघ (४४, रा़ मंगलमुर्तीनगर, ओमदादाजी मंदिराजवळ, पिंपळनेर ता़ साक्री) ही महिला पायी जात होती़ त्याचवेळेस २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी तरुण दुचाकीवरुन धुमस्टाईलने त्या महिलेजवळ तिच्या पाठीमागून आले आणि क्षणार्धात तिच्या गळ्यातील ३७ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक आणि १ तोळा वजनाची व १० हजार रुपये किंमतीचे मनीमंगळसुत्र असे एकूण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज ओरबाडून नेला. घटनेनंतर त्या महिलेने आरडाओरड केली पण, अंधाराचा फायदा घेऊन या दोघा भामट्यांनी पोबारा केला़ लागलीच या महिलेने देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली़ याप्रकरणी शनिवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस हेड कॉन्स्टेबल आय़ एऩ ईशी घटनेचा तपास करीत आहेत़ दुसरी घटना रविवारी देवपुरातील शिवपार्वती कॉलनीत भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरून धूमस्टाईलने येऊन दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावून पोबारा केला़ भरदुपारी अशा प्रकारची घटना घडल्यामुळे  महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी