शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृषिसेवा केंद्रातून लांबविला पावणेदोन लाखांचा ऐवज

By अतुल जोशी | Updated: December 1, 2023 18:06 IST

शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील घटना, पोलिसात गुन्हा

अतुल जोशी, धुळे, शिरपूर: कृषिसेवा केंद्राच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने कीटकनाशक औषधांसह रोख रक्कम असा १ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावात गुरुवारी पहाटे घडली. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील तरडी चंद्रकांत भालेराव पाटील (वय ५४) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर तालुक्यातील तरडी गावात त्रिमूर्ती कृषिसेवा केंद्र नावाचे कीटकनाशक औषधांचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून पाटील घरी गेले. मध्यरात्री कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. शोधाशोध करून कीटकनाशक औषधांचा साठा आणि दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण १ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटून चोरट्याने पळ काढला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली.

३० रोजी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी पाटील आले असता, दुकानाला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. दुकानात जाऊन पाहणी केली असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती थाळनेर पोलिसांना कळविली.  या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी