शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

तीन वर्षात राज्यात दोन लाख कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:24 IST

मंत्री चंद्रकांत पाटील : धुळे व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

ठळक मुद्देधुळे व नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक.सव्वा तासाच्या बैठकीत सकारात्मक व चांगले काम करण्याचा मंत्री पाटील यांनी दिला सल्ला. चांगले काम करण्याचे अभियंत्यांना दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  राज्य शासनातर्फे येत्या तीन वर्षात दोन लाख कोटींच्या रस्त्याची कामे करायची आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अभियंत्यांनी सकारात्मक विचार ठेऊन काम केले पाहिजे, असा सल्ला महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी  ते बोलत होते. मंचावर मंत्री राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते. राज्यात गुणवत्तापूर्ण रस्ते तयार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने येत्या तीन वर्षात राज्यातील रस्त्यांची  १ लाख ६ हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० हजार कोटी व सहा पदरी रस्त्यांची ५० हजार कोटी व अन्य कामांचा समावेश आहे. शासनातर्फे उत्कृष्ट रस्ते तयार केले जाणार आहेत. कुणीही नावे ठेवणार नाहीत? याची काळजी अभियंत्यांनी घ्यावी, असा सल्ला मंत्री पाटील यांनी दिला.