लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कामानिमित्त चाळीसगावच्या दिशेने जाणाºया दोघा तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत आपला प्राण गमवावा लागला़ ही घटना गरताडबारीजवळ दुपारी घडली़ या घटनेमुळे ते राहत असलेल्या वरखेडी गावावर शोककळा पसरली़ धुळे तालुक्यातील वरखेडी येथे राहणारे भुषण साहेबराव धनगर (२७) आणि अंबादास बन्सीलाल शिंदे (२९) हे दोघे घराला टाईल्स बसविण्याचे काम करतात़ बºयाच वर्षापासून हे दोघे सोबत आहेत़ याच कामानिमित्त हे दोघे तरुण एमएच १९ यू ९६७० क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याकडून चाळीसगावकडे जात होते़ दुपारी ३ वाजेच्या सुमारास ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली आणि त्यात त्यांचा जागीच अंत झाला़ भुषण याचे वडील वारले असून त्याची आई आणि पत्नी मजुरी करतात़ तर अंबादास याला २ मुले, २ मुली असून पत्नी, आई-वडील आहेत़ वडील मातीकाम करतात़
धुळ्यानजिक वरखेडीचे दोन कारागिर अपघातात जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:20 IST
गरताडबारीजवळील घटना : गावात शोककळा
धुळ्यानजिक वरखेडीचे दोन कारागिर अपघातात जागीच ठार
ठळक मुद्देगरताडबारीजवळ ट्रक-दुचाकीचा अपघातवरखेडीच्या दोघांचा नाहक बळीगावावर पसरली शोककळा