मोहाडी येथील रितेश (पवन) महादू मिंड याने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंप्री शिवारातील शेताजवळ अविनाश साधू मिंड, गणेश साधू मिंड, नीलेश साधू मिंड, सर्व रा. रानमळा यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. शेतीच्या हिस्से वाटणीवरून ही मारहाण झाल्याचे रितेश याने तक्रारीत नमूद केले आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेत मोहाडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटाकडून गणेश साधू मिंड याने तक्रार दाखल केली. त्यानुसार, सोमवारी दुपारी महादू नाना मिंड, यमुना महादू मिंड, पवन महादू मिंड, रवींद्र महादू मिंड, सर्व रा. मोहाडी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. याही तक्रारीची दखल घेत सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला. दोन्ही घटनांचा तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.