शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात हाणामारीने तणावपूर्ण वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:48 IST

फागणे गावातील घटना : पोलिसात नोंद नाही

ठळक मुद्देबाळापूर फागणे गावात रात्रीचा प्रकारतुंबळ हाणामारी झाल्याची अफवाचपोलिसात कोणत्याही प्रकारची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील फागणे गावात शनिवारी सायंकाळी उशिरा दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद हाणामारीत उमटले़ झोंबाझोंबी झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, रविवारी दुपारपर्यंत घटनेची कोणतीही नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर फागणे हे गाव धुळे तालुक्यातील संवेदनशिल म्हणून परिचित आहेत़ यापुर्वी सण उत्सवाच्या काळात अनेकवेळा दोन गटात वाद झाले आहेत़ शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत देखील उमटले आहेत़ लाठ्या-काठ्यांसह लोखंडी पाईप आणि तलवारीचा देखील सर्रासपणे वापर झालेला आहे़ त्यामुळे धुळे तालुका पोलिसांचे या गावाकडे आणि गावातील हालचालींकडे बारीक लक्ष असते़ गावात सायंकाळच्या वेळेस बहुतेक ठिकाणी, चौका-चौकात गप्पांचा फड रंगलेला असतो़ अशाच गप्पांचा फड रंगलेला असताना शनिवारी सायंकाळी उशिरा अचानक दोन गटात वाद झाला़ क्षणार्धातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाल्याने त्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यावेळी तलवारी, लोखंडी पाईप काढण्यात आले होते़ वस्तुत: असा कोणताही प्रकार गावात घडला नसल्याचे रविवारी दुपारी समोर आले़ तलवारीसारख्या कोणत्याही हत्यारांचा वापर झाला नसून किरकोळ स्वरुपाचा वाद झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ परिणामी हत्यार निघाल्याची शेवटी अफवाच ठरली़ ही अफवा मात्र वाºयासारखी पसरली होती़ शनिवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार झाल्याने तणावपूर्ण वातावरण रविवारी देखील कायम होते़ रविवारी दुपारपर्यंत धुळे तालुका पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद घेण्यात आलेली नव्हती़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा