शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मागील भांडणाची कुरापत काढून दोन गट भिडले; ९ जणांविरोधात गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: January 6, 2024 16:59 IST

लाकडी दांडक्यासह दगड विटांचा सर्रास वापर.

देवेंद्र पाठक,धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून दोन गट एकमेकांना भिडले. यात लाकडी दांडक्यासह दगड विटांचा सर्रासपणे वापर झाल्याने तणाव निर्माण झाला. हाणामारी झाल्याने पळापळ झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी देवपुरातील पितांबर चौक भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी देवपूर पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी विश्वनाथ दयाराम शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली. 

त्यानुसार, देवपुरातील विष्णू नगर भागातील पितांबर चौकात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. मागील भांडणाची कुरापत काढून यावेळी वाद निर्माण करण्यात आला. एकमेकांना भिडल्याने शिवीगाळ करण्यात आली. वाद विकोपाला गेल्याने तणाव निर्माण झाला. मारामारी करण्याच्या उद्देशाने आलेल्यांच्या हातात लाकडी दांडके होते. काहींनी दगड आणि विटांचा आधार घेत एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. हाताबुक्क्याने मारहाण करत एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये पळापळ झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. साैम्य बळाचा वापर करत गर्दी पांगविण्यात आली. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ९ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १६०, ३२३, ३३६, ३३७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी