धुळे जिल्हा रुग्णालय धुळे येथील आताच आलेल्या ५८ अहवालानुसार शहरातील नवीन २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यात गरीब नवाज नगरातील एका ६० वर्षीय पुरुष तर मुस्लिम नगरातील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़ दरम्यान आतापर्यत ५६ अहवाल निगेटिव्ह निघाले आहे़ दोन्ही रुग्णाच्या संपर्कात असलेल्या रूग्णांचा शोध घेतला जाणार आहे़ अशी माहिती डॉ़ विशाल पाटील यांनी दिली़ दरम्यान जिल्ह्यात आतापर्यत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १११ झाली आहेत़ तर मृत्यू झालेल्यांची संख्या १४ आहे़
धुळ्यात दोन कोरोना बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:56 IST