शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साक्री पं.स.चे दोन लाचखोर जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:54 IST

एसीबीची कारवाई : दोन हजाराची लाच मागितली

ठळक मुद्देसाक्री पंचायत समितीत दोघे लाचखोर जाळ्यातलाचेची मागणी केल्याने एसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : उपशिक्षकाचे वैद्यकीय रजेचे वेतन आणि रजा मंजुरीची रक्कम काढून देण्याच्या प्रक्रियेसाठी दोन हजाराच्या लाचेची मागणी करणाºया साक्री पंचायत समितीतील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले़ ही कारवाई मंगळवारी झाली़ या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ त्या दोघांविरुध्द साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत़ सन २०१७ मध्ये त्यांचा अपघात झाला होता़ त्यांचे वैद्यकीय रजेचे वेतन (पगार) बिल आणि रजा मंजुरीसाठी साक्री पंचायत समिती येथील कार्यालयात प्रलंबित होते़  साक्री पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील लिपीक नंदकुमार रामदास खैरनार (४५) आणि वित्त विभागाचे सहायक लेखाधिकारी प्रदीप हरीभाऊ साबळे (५७) यांनी वैद्यकीय रजेचे पगार बिल काढून देण्याच्या प्रक्रियेसाठी तक्रारदारांकडे ३ हजाराच्या लाचेची मागणी केली. हे प्रकरण गेल्या ८ महिन्यांपासून पैशांसाठी प्रलंबित होते़ त्यामुळे तक्रारदार यांनी ३१ आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ या प्रकरणाची पडताळणी केली असता तडजोडीअंती २ हजाराच्या लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार सापळा लावण्यात आला होता़ पण, दोघांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नव्हती़ त्यानंतर मंगळवार ११ सप्टेंबर रोजी सहायक लेखाधिकारी प्रदीप हरीभाऊ साबळे यांना साक्री पंचायत समिती येथून आणि शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक नंदकुमार रामदास खैरनार यांना जिल्हा परिषदेतून ताब्यात घेण्यात आले़ या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारणा) कायदा सन २०१८ चे कलम ७ अन्वये साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, संदिप सरग, सतिष जावरे, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस