शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

बसच्या धडकेने दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 12:02 IST

चिमठाणे ते दराणे दरम्यान अपघात : बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत

शिंदखेडा,दि. 11  : सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावरील चिमठाणे ते दराणे दरम्यान खलाणेकडे जाणा:या कच्चा रस्त्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येणा:या मोटरसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात  खंडू पुंजू पाटील (वय 49, रा. दोंडाईचा) व मागे बसलेला सतीश विनायक पवार (वय 25, रा. दराणे)  हे दोघे जागीच ठार झाले. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
धुळ्याकडून दोंडाईचाकडे दोन एस. टी. बसेस एकापाठोपाठ जात होत्या. त्यात मागे असणा:या बसने (क्रमांक एम. एच. 20 बीएल 2303) पुढे चालत असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणा:या मोटरसायकलला (एम. एच. 18 ए. एफ. 0883) धडक दिली. त्यामुळे त्यावरील खंडू पाटील व सतीश पवार हे जागीच ठार झाले. ते चिमठाणे येथून दराणेकडे  जात   होते. 
या प्रकरणी किशोर साहेबराव पवार यांच्या फिर्यादीवरून बसचालक जितेंद्र हिरामण सूर्यवंशी याच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.