धुळे : तालुक्यातील नगाव शिवारात शनिवारी मध्यरात्री झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात छडा लावला आहे़दिनकर रघुनाथ पाटील यांच्या मालकीच्या कंपनीच्या गोदामातून एक लाख ८२ हजार ४०० रुपये किंमतीचे अॅल्युमिनीयम तार चोरण्यात आले़ सात ते आठ दरोडेखोरांनी रखवालदारासह शेजारच्या हॉटेलमधील कामगारांना मारहाण करीत एका खोलीत डांबून चारचाकी वाहनातून तार लंपास केली़ याप्रकरणी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता़एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत, सहायक फौजदार नथ्थु भामरे, पोलीस नाईक कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, संजय पाटील, केतन पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास लावला असून रिझवान शेख रहीम रा़ अजमेर नगर धुळे, इमरान खान नुरखान पठाण रा़ मौलवी गंज धुळे या दोघांना अटक करुन बोलेरो पिकअप वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ दोघा संशयितांना देवपूर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली़
दरोड्याच्या गुन्ह्याचा चोवीस तासात तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 20:40 IST