धुळे : राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला तळागळातून पाठिंबा वाढत असून या आंदोलनाला बळ देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सत्यशोधक शेतकऱ्यांनी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ निदर्शने करीत पाठिंबा दिला. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विराेधी कायद्याच्या विराेधात पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांकडून आंदाेलन पुकारले आहे. या कायद्यांना केवळ या दाेन्ही राज्यातील नव्हे तर सर्वच शेतकऱ्यांचा विराेध आहे. केंद्र सरकारने केलेले शेतकरी विराेधी कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदाेलनाला पाठींबा म्हणून सत्यशाेधक शेतकरी सभा, सत्यशाेधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशाेधक महिला सभा जनआंदाेलन संघर्ष समितीतर्फे धुळ्यात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवदेन देण्यात आले. कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जनआंदाेलन संघर्ष समितीतर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला. त्यानंतरही केंद्र सरकारने कृषी विषयक तीन्ही कायद्यात बदल केला नाही. त्यामुळे पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांकडून दिल्लीत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात सुभाष काकुस्ते, किरण पवार, वंजी गायकवाड, मन्साराम पवार, अशपाक कुरेशी, सुरेश माेरे, पाेपट माळचे, गुलाब चव्हाण, लाेटन मालुसरे, बबलू भाेसले, काचमेल चंदणे, ईमाबाई चंदणे, रतन साेनवणे, सुरेश दावळसे, हिरनाथ चव्हाण, कुमाऱ्या साेनवणे, शिवाजी केंद्रे, दिलीप अहिरे, नवल ठाकरे, शाना धनमरे, महेंद्र साेनवणे, देवराज चव्हाण, निंबाबाई ब्राह्मणे, बन्सीलाल पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.मागण्या अशा : केंद्राने विशेष अधिवेशन घेवून मंजुर केलेले तिन्ही शेतकरी विराेधी कायदे मागे घ्यावे, शेतमालाला किमान हमी भाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामीनाथन अायाेगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकऱ्यांवरील दडपशाही थांबावू, अांदाेलनावरील गुन्हे मागे घ्यावे, लाेकशाही संविधानाचा अादार राखून त्यांचे म्हणणे एेकून घ्याव, सन्मानाने मार्ग काढावा, -विज विधेयक २००२ मागे घ्यावे,राज्य सरकारने मागणीनुसार सुसंगत कायदे करण्यासाठी पावले उचलावी.
सत्यशोधक शेतकऱ्यांचे धुळ्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 14:59 IST