शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलचा धाक दाखवत ट्रक पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:54 IST

महामार्गावर दरोडा : मुद्देमालही लंपास

ठळक मुद्देधुळ्यानजिकची घटनामोहाडी पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर सशस्त्र दरोडेखोरांनी चालकावर पिस्तुल रोखून सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालांसह ट्रक पळविल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ याप्रकरणी मंगळवारी पहाटे मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ शरद बाळासाहेब चव्हाण (३२, बांभोरा जि़ अहमदनगर) या तरुण शेतकºयाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शरद चव्हाण हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते दौंड येथील साखर कारखान्यात मजूर पुरविण्याची कामे करतात़ सोमवार २२ आॅक्टोबर रोजी अमळनेर येथून एमएच १८ एए ४४५१ या ट्रकमध्ये ११ बैल तर एमएच १८ एए ५७२४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ७ बैल आणि १० लोखंडी गाडे भरलेले होते़ हे दोनही ट्रक अमळनेर येथून धुळेमार्गे दौंडकडे जात असताना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अवधान गावाजवळ एमएच १८ एए ५७२४ हा ट्रक पुढे निघून गेला़ त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुसरा ट्रक महामार्गावर निघाला़ अवधान एमआयडीसीपासून १ किमी इतक्या अंतरावर दुचाकी आणि चार चाकी वाहनातून आलेल्या २५ ते ३० जणांनी ट्रकला घेरले़ पोलिसात असल्याचे सांगून दोन दरोडेखोर गावठी कट्टे घेऊन ट्रकमध्ये चढले़ चालकावर पिस्तूल रोखून त्यांनी ट्रक अवधान फाट्यापर्यंत आणला़ त्यानंतर या दरोडेखोरांनी ट्रक चालकाला ट्रकमधून उतरविले आणि ट्रकसह पलायन केले़ एकूण १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी जबरीने चोरुन नेला़ २५ ते ३० वयोगटातील दरोडेखोर मराठी व हिंदी भाषा बोलत होते़ याप्रकरणी भादंवि कलम ३९५ प्रमाणे मोहाडी पोलिसात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी