शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

गुरांचे चामडे घेऊन जाणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:04 IST

धुळे तालुका पोलीस : ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल

धुळे : गुरांचे चामडे जळगावच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या ट्रकला धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने शिताफिने पकडले़ अडीच लाखांचे चामडे आणि ५ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई धुळे तालुक्यातील मुकटीनजिक शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़पारोळा रोडने एक ट्रक जळगावच्या दिशेने गुरांचे चामडे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली़ माहिती मिळताच त्या ट्रकची खातरजमा करण्यात आली़ तालुका पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पारोळा रोडने मुकटी गावापर्यंत गेले़ पथकाने मुकटी बसस्थानकाच्या परिसरात रोडवर सापळा लावला होता़ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पारोळाच्या दिशेने जाणारा डब्ल्यूबी ११ डी ३२८६ क्रमांकाचा ट्रक पोलिसांना दिसला़ मिळालेल्या माहितीनुसार हाच ट्रक असल्याने पोलिसांनी तो थांबविला़ ट्रकचालक मोईन खान सत्तार खान (५९, झारखंड) याच्याकडे ट्रकमध्ये काय आहे, अशी विचारणा केली़ यावर त्या ट्रकचालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली़ परिणामी पोलिसांना आणखी संशय बळावला़ त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्या ट्रकची तपासणी करण्यात आली़ या ट्रकमध्ये २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे गुरांचे ८५० नग चामडे मिळून आले़ या चामड्यांसह पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे, कैलास चौधरी, पोलीस कर्मचारी प्रविण पाटील, शुरसिंग पाडवी, दिनेश मावची, देसले यांनी ही कारवाई केली़ ट्रक चालक संशयित ट्रकचालक मोईन खान सत्तार खान याच्याविरुध्द पोलीस कर्मचारी दिनेश मावची यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल ए़ टी़ सोनवणे करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे