शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघात, दीर-भावजायीचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:33 IST

सरवड फाटा : सुदैवाने बालक बचावला

ठळक मुद्देमुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सरवड फाट्याजवळील घटनाट्रकच्या धडकेत दीर-भावजायीचा अंत, दोन वर्षाचा बालक बचावलापाहणाºयांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ चुकीच्या दिशेने येणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिली़ यात दीर आणि भावजायीचा करुण अंत झाला़ तर, दोन वर्षाचा चिमुरडा सुदैवाने बचावला़ ही घटना सोमवारी दुपारी घडली़ शिंदखेडा तालुक्यातील सुराय येथील दिनेश रामचंद्र पाटील (२८) आणि त्याची वहिनी वर्षाबाई कल्पेश पाटील (२५) हे त्याचा पुतण्या शिव कल्पेश पाटील (२) याला घेवून आरजे ३६ एसएन २६५६ क्रमांकाच्या दुचाकीने सोनगीरकडून धुळ्याकडे येत होते़ पुतण्या शिव हा आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखविण्यासाठी हे तिघे धुळ्याकडे येत होते़ त्याचवेळी सरवड फाट्यावर पेट्रोल भरुन विरुध्द दिशेने रस्त्यावर आलेल्या एमपी ०९ एक्सएक्स १४७२ या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात दिनेश पाटील आणि वर्षाबाई पाटील हे दोघे जागीच ठार झाले़ दोन वर्षाचा शिव मात्र सुदैवाने बचावला़ त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ घटनास्थळावरुन ट्रक चालक आणि सहचालक पसार झाले आहेत़ घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती़ परिणामी वाहतूक बराचकाळ विस्कळीत झाली़ धनराज दगाजी पाटील (रा. सुराये ता. शिंदखेडा) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ ट्रकचालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़