कापडणे - निकुंभे येथील जि.प.शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व जाणून बियांंचे अंकुरण करुन रोपे तयार केली. परिसरातील बेलफळांतील बियांचे वाटप वर्गातील विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी घरी बी रोवून रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला. पंचवीसहून अधिक रोपे तयार झाली. ही रोपे विद्यार्थ्यांनी शाळा, घर, शेत आदी परिसरातील ठिकाणी लावली. ही रोपे निगा ठेवून वाढविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे. पर्यावरणाची जोपासना करणारा हा उपक्रम असून प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावावी आणि जगवावीत. असे आवाहन मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी केले.
वृक्ष लागवड... विद्यार्थ्यांनी बियांचे अंकुरण करुन केले रोपण ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:45 IST