लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासह जिल्ह्यात विविध संस्थाच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. अनेकांनी हे वृक्ष जगविण्याचा संकल्प केला.शिरपूरआर. सी. पटेल आय. एम. आर. डी. परिसंस्थेत वृक्षारोपण झाले.राष्ट्रीय सेवा योजना पुणे विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने @‘झाडे लावा झाडे जगवा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत वृक्षारोपण झाले.या मोहिमेत आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, सहसंचालक व एम. सी. ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एम. एम. एस. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज पाटील, प्रा. मानसी वैद्य यांनी परिसंस्थेच्या आवारात सोशल डिस्टंसिंग द्वारे विविध जातींचे वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज पाटील, प्रा. मानसी वैद्य यांनी परिश्रम घेतले.दोंडाईचायेथे लायन्स क्लब शताब्दीच्या वतीने सुवर्णकार मंगल कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले प्रांताध्यक्ष नवलजी मालू व संस्थापक अध्यक्षा सुगंधा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झाले. याप्रसंगी लायन्स क्लबचे रिझन चेअरमन कन्हैया बागल, पालिकेचे अभियंता शिवनंदन राजपूत, योजना राजपूत आदी उपस्थित होते. शताब्दी अध्यक्षा संध्या सोनार,सचिव ममता बोधवानी, राजश्री गर्गे, सुगंधा जैन, शकुंतला बागुल वैशाली पाटील नीता सोनार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संजय सोनार किशोर जैन यांचे सहकार्य लाभले.दुसाणेमाळमाथा परीसरातील हाट्टी खु. येथे ग्रामपंचायततर्फे ११०० वृक्ष रोपे लागवड व अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे टेबल खुर्च्या वाटप करण्यात आले. गेल्या ५ वर्षापासून दरवर्षी १००० रोपांची लागवड करण्यात येते. ५ वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंत ५००० हजार अनेक प्रकारच्या वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. गावात निसर्ग व स्वच्छतेचे वातावरण गावात निर्माण झालेले आहे.एक वृक्ष एक व्यक्ती असा नारा देण्यात आला. गावात ८ अंगणवाडीत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात एक टेबल व २ खुर्च्यांचे वाटप केले. यावेळी सरपंच हासर आनंदा पदमोर, उपसरपंच भटा बारका थोरात, गटनेते आनंदा पदमोर, हिरालाल देवरे, कारभारी मासुळे, हिरालाल शिंदे, दौलत पदमोर, तुळशिराम पदमोर, भगवान पदमोर, दादाभाई खंडेकर, डॉ. सतीलाल पदमोर, डोंगराळे येथील प्रभाकर निकुंभ, आनंदा मासुळे, सुरेश थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी दत्तु पदमोर, गंगाराम पदमोर, मच्छिंद्र पदमोर, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:23 IST