दरम्यान, येथील टोल प्लाझा कंपनी वाहनधारकाकडून टोलवसुली करते त्याबदल्यात वाहनधारकांना चांगल्या सुविधा व रस्त्याची देखभाल ठेवणे गरजेचे असताना वाहनचालकांना खड्डे असलेल्या खराब रस्त्यावरून मार्गक्रमण होत नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकामधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असल्याने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती केली जावी यासाठी शुक्रवारी येथील लोक क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले अन्यथा आगामी काही दिवसात टोलबंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी लोक क्रांती सेनेचे जिल्हा सचिव उमेश पाटील, जिल्हा सल्लागार समाधान पाटील, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष लखन ठेलारी, सोनगीर शाखा अध्यक्ष प्रवीण पाटील, सोनगीर शहर उपाध्यक्ष सोनू धनगर, ग्रामपंचायत सदस्य मोहन सैंदाने, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यावर खड्ड्यात केले वृक्षारोपण, रस्ता दुरवस्थेबाबत नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST