लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील मांजरोद येथील तापी नदी काठावरील श्री तीर्थक्षेत्र भुयारेश्वर गणपती देवस्थान परिसरात भूपेशभाई ग्रीन आर्मीच्यावतीने श्रावण सोमवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व शिरपूर टेक्स्टाईल पार्कचे चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले़भूपेशभाई ग्रीन आर्मीतर्फे पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरासह तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आले़ हजारो वृक्ष लागवड करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.मांजरोद येथील तापी नदी काठावरील श्री तीर्थक्षेत्र भुयारेश्वर गणपती देवस्थान परिसर हा हिरवळीने नटविण्यासाठी तसेच तापी नदी काठाचा संपूर्ण परिसर पर्यटनस्थळ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले़यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, थाळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पीएसआय राजेंद्र माळी, हर्षल बागुल, मांजरोद सरपंच भुलेश्वर पाटील, महेश पाटील, गोपाल पाटील, पोलीस पाटील प्रवीण बैसाणे, उपसरपंच रविंद्र कोळी, ताजपुरी सरपंच हेमंत सनेर, रितेश गुजर, भास्कर पाटील, दरबार राजपूत, अनिल कोळी, प्रभाकर पाटील, लिलाचंद पाटले, गोकुळ कोळी, गणेश धनगर, संजय पाटील, अरुण पाटील, वासुदेव पाटले, पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, भालेराव माळी, सुकदेव पाटील, श्याम पाटील, भास्कर वारुळे, योगेश पाटील, साहेबराव धनगर, प्रमोद ढिवरे, शिवा भिल, पंडित कोळी, सुनील जैन, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळ मांजरोद, युथ आॅर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) चे तरुणही यावेळी उपस्थित होते.वृक्षारोपण मोहीमेसाठी भूपेशभाई ग्रीन आर्मीचे धिरज देशमुख, बापू महाजन, बकुल अग्निहोत्री, ललित फिरके, रवी पाटील, गिरीश सनेर, दिपक बडगुजर, प्रशांत पवार, जय माळी, जितेंद्र शेटे, गजेंद्रसिंग, प्रविण बागले आदींनी परिश्रम घेतले.
भुयारेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:03 IST