शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील पाच वेडसर व्यक्तींवर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:47 IST

मिशन - न्याय सर्वांसाठी उपक्रम : अव्याहतपणे सुरु राहणार मोहीम, जे़ ए़ शेख यांची माहिती

ठळक मुद्देमनोरुग्णांसाठी ‘मिशन - न्याय सर्वांसाठी’ हा उपक्रमधुळे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत नियोजनमोहिमेत एकूण ५ मनोरुग्णांना पकडून पाठविले ठाणे रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनोरुग्णाना सन्माने जीवन जगण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या हितासाठी धुळे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत ‘मिशन - न्याय सर्वांसाठी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याअंतर्गत ५ जणांना धरुन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करत त्यांना ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश जे़ ए़ शेख यांनी दिली़ भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांपैकी जीवन जगण्याचा अधिकार हा सर्वात श्रेष्ठ अधिकार असून नागरीकांना सन्मानाने जीवन जगता यावे याकरीता महत्वपूर्ण तरतूद संविधानात केली गेलेली आहे़ त्याअंतर्गत धुळ्यात न्याय सर्वांसाठी हे मिशन राबविण्यास सुरुवात झाली आहे़ समाजात बरेचसे मानसिक रुग्ण, निवाराहिन, अर्धनग्न अवस्थेत फिरताना दिसून येतात़ अशांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे़ राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण दिल्ली यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण मुंबई अंतर्गत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाने सध्या मानसिक रुग्ण व मानसिक विकलांग व्यक्तींकरीता विधी सेवा योजना राबविली जात आहे़ सदर योजनेतंर्गत जिल्हा विधी प्राधीकरणाचे सचिव जे़ ए़ शेख यांच्या संकल्पनेतून ‘मिशन - न्याय सर्वांसाठी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ या उपक्रमानुसार धुळे शहरात रस्त्यावर निवाराहीन, अर्धनग्न अवस्थेत फिरणाºया मनोरुग्णांना सुरक्षितपणे घेऊन विधी स्वयंसेवकांमार्फत स्वच्छता करुन संबंधित पोलीस स्टेशनला कायद्यानुसार मिसींग रिपोर्ट दाखल केला जात आहे़ एवढेच नव्हेतर मनोरुग्णांना न्यायालयापुढे हजर करुन प्राथमिक चौकशी तसेच वैद्यकीय अहवालाचे आधारे मानसिक उपचाराची आवश्यकता भासत असल्यास पुढील प्रभावी उपचार व आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे़ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व मनोरुग्णाला न्यायालयात मोफत कायदेशीर सहाय्य मिळण्यासाठी विधी सेवा प्राधीकरणाच्यावतीने अ‍ॅड़ विनोद बोरसे यांची नेमणूक करण्यात आली आहे़ विशेष पथकात सहायक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह राजेंद्र सुर्यवंशी, निलेश पाटील, वसंत पाटील, भाईदास साळुंखे, कुणाल दाभाडे, मुकुंदा जगताप या पोलीस कर्मचाºयांचा पथकात समावेश आहे़ मनोरुग्णांच्या स्वच्छतेसाठी धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे, रत्ना मोरे, पवन खरात, इम्रान शेख या स्वयंसेवकांची पथकाला मदत होत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे