शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

यात्रा रद्द, आठवडे बाजार, मंदिरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:04 IST

खबरदारी : ग्रामीण बाजारपेठेत शुकशुकाट, व्यवहार ठप्प, ढंडाण्याची कपिलेश्वर यात्रा पोलिसांनी केली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/दोंडाईचा/तिसगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी शहरासह ग्रामीण भागातील जनता उत्स्फूर्तपणे दक्षता बाळगत असून प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले जात आहे़ मेळावे, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांवर ३१ मार्च पर्यंत प्रशासनाने बंदी घातली आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील यात्रा तसेच आठवडे बाजार रद्द करण्यात आले आहेत़कोरोनामुळे ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे़ ग्रामीण बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे़ व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे व्यावाऱ्यांचे नुकसान तर होतच आहे; पण अनेकांचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़विशेष म्हणजे नागरीकांकडून उत्स्फूर्तपणे कमालिची दक्षता घेतली जात असून ग्रामीण भागातही नागरीकांनी मास्क, रुमाल तोंडाला गुंडाळले आहेत तर हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचाही वापर होताना दिसत आहे़वरखेडे गावाची यात्रा रद्दकोरोनामुळे वरखेडे गावातील बहीराम महाराज यांचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे़ दरवर्षी गुढीपाडव्याला ही यात्रा भरते़ परंतु यंदा प्रशासनाने बंदी घातल्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून दुकाने लावणाºया व्यापारी, व्यावसायिकांनी येवू नये, असे आवाहन शिवसेनेचे उपतालुका प्रमुख देवराम माळी, ईश्वर मराठे, रवींद्र धनगर, रामदास माळी, रवींद्र पाटील, सुधाकर पाटील, भगवान मराठे, मनोहर जयराम मराठे, नरेंद्र चौधरी यांच्यासह गावकऱ्यांनी केले आहे़पिंपळादेवीची यात्रा रद्दसव्वाशे वर्षांची परंपराप्रशासनाच्या आदेशानुसार तिसगाव येथील ग्रामस्थांनी सवार्नुमते चर्चा करून पाडव्याच्या दुसºया दिवशी आई पिंपळादेवी देवी यात्रोत्सव व कुस्त्यांची दंगल रद्द करण्याचा निर्णय घेतला़ ब्रिटिश काळापासून सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत कधीही खंड पडला नाही़ त्यामुळे गावासह पंचक्रोशीत काही अंशी नाराजी आहे़ दरम्यान, ढंडाने येथील कपिलेश्वर महादेवाची यात्रा मंगळवारी रात्री पोलिसांनी बंद केली़दरम्यान, तमाशा मंडळ, खेळणी, पाळणे, हॉटेल्स आणि इतर व्यवसायिकांसह मल्ल आणि कुस्ती प्रेमींनी यात्रोत्सवाला येवू नये असे आवाहन सरपंच ज्ञानजोती भदाणे, विनायक पाटील, दिनेश भामरे, पंकज भामरे, सचिन पाटील, संदीप शिरसाट यांनी केले आहे़देवपूर पश्चिमचे पोलिस निरीक्षक कुबेर कचवे यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी जमाव बंदी करण्यात आली आहे़ त्यामुळे आम्ही स्थानिक पोलीस पाटील यांना कळवून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत़दोंडाईचा येथील गुरुवारचा आठवडे बाजार बंदखबरदारीचा उपाय म्हणून दोंडाईचा शहरातील जिम, गुरूवारचा आठवडे बाजार, खाजगी शिकवण्या बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.तसेच नगरपालिकेच्या प्राथमिक, अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. तीन जिम बंद ठेवण्याची नोटीस दिली आहे़कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, जनतेने कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती मिळावी म्हणून नगरपालिकेतर्फे माहिती पत्रक वाटणार आहे. कोरोना बाबत कोणीही अफवा पसरवू नये़जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ़ दीपक सावंत, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी केले आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़४कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी समाजस्वास्वास्थ्याचा विचार करुन शासनाच्या आदेशानुसार जनहितार्थ ३१ मार्च पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी घेण्यात आला़ भाविकांनी दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन बीएपीएस स्वामी नारायण मंदिर संस्थेतर्फे करण्यात आले आहे़ भाविकांनी शक्यतो बाहेर निघू नये असे आवाहन त्यांनी केले आहे़४धुळे येथील एकवीरा देवी व रेणुकामाता मंदिरात केवळ खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्र आणि शेजाराच्या राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात़ ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकवीरा देवी मंदिर बंद करण्याचे आदेश मंगळवारी प्रशासनाने दिले़ मंदिर ट्रस्टला प्रशासनाचे पत्र प्राप्त झाले असून ३१ मार्च पर्यंत मंदिर बंद करण्यात आल्याची माहिती एकवीरा देवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टने दिली़ परंतु धार्मिक विधी सुरूच राहतील असे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी स्पष्ट केले़

टॅग्स :Dhuleधुळे