शिरपूर : जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिरपूर तालुक्यात आदिवासी गावदिवाळी उत्सव नुकताच पारंपरिक पध्दतीने साजरा झाला. तालुक्यातील पळासनेर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तलावपाडा येथे गावदिवाळी येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. हा उत्सव साधारणता तीन दिवस साजरा केला जातो. विधिवत निसर्ग पूजा म्हणजेच वाघदेव, डोंगऱ्यादेव, राणीकाजल, गिरहोणआई या आदिवासी देवतांची पुजा केली गेली. काही ठिकाणी या उत्सवाला राणीदिवाळी असेही म्हणतात. उत्सवात ढोल वाजवून विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
आदिवासींची परंपरागत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:27 IST