धुळे : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धुळ्यासह परिसरातील आपल्याकडील शेतीमाल विक्रीसाठी आणला आहे़ पण, बाजारी घेण्याचे उद्दिष्ठ पूर्ण झाल्याचे कारण सांगून बाजरीची खरेदी सोमवारपासून थांबविली आहे़ परिणामी शेतकरी आपला शेतीमाल आणून विक्रीच्या प्रतिक्षेत आहे़ एमआयडीसीमध्ये ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत़दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनच्यावतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल घेण्याचे नियोजन आखण्यात आले़ त्यासाठी फेडरेशनकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शेतीमाल घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते़ त्यात मका ४४ हजार ९०५़४० मेट्रीक टन, ज्वारी १५ हजार ४३६़७५० मेट्रीक टन, बाजरी ९५० मेट्रीक टन आणि रागी ७५० मेट्रीक टन घेण्याचे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्यामुळे धुळेसह परिसरातील शेतकºयांनी आपल्याकडील शेतीमाल मार्केटींग फेडरेशनच्या अवधान एमआयडीसी येथील गोदामात विक्री करण्यासाठी आणला आहे़ सध्याच्या परिस्थितीत ज्वारी आणि मकाची खरेदी सुरु आहे़ त्यात मक्याचा हमीभाव १ हजार ८५० रुपये, ज्वारीचा हमीभाव २ हजार ६५० रुपये, बाजरीचा हमीभाव २ हजार १५० रुपये याप्रमाणे दिला जात आहे़ सध्याच्या परिस्थितीत मका आणि ज्वारीची खरेदी फेडरेशनकडून केली जात आहे़ परिणामी ज्वारी आणि मका घेऊन येणारे शेतकरी आपला शेतीमाल हमी भावाने विकून मार्गस्थ होत आहेत़असे चित्र एकीकडे असताना बाजरी सध्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर हमीभावाने विक्री होण्यासाठी दाखल झाली आहे़ ९५० मेट्रीक टन इतकी त्याची घेण्याची क्षमता असल्यामुळे त्याच्या पुढील आलेली बाजरी आल्याने त्याच्या खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आलेली आहे़ यासंदर्भात शेतकºयांनी विचारणा केली असता शासनाकडून पुढील आदेश येईपावेतो बाजरीच्या खरेदीस नकारात्मकता दर्शविली आहे़ परिणामी धुळ्यातील अवधान एमआयडीसी परिसरात धुळ्यासह आर्वी, शिरुड, बोरकुंड, मुकटी, अजंग, नंदाळे, तरवाडे आणि अन्य ठिकाणाहून शेतकरी बाजरी घेवून दाखल झालेला आहे़ बाजरी खरेदीच्या प्रतिक्षेत सोमवारपासून थांबलेला हा बळीराजा मंगळवारी सायंकाळपर्यंत तिथेच थांबून होता़
बाजरीची खरेदी थांबल्याने लागल्या ट्रॅक्टरच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:30 IST