शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

कृषी उपयोगासाठी दिलेले ट्रॅक्टर धावताहेत रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST

शिरपूर : करामधून सूट मिळविण्यासाठी लढविली शक्कल; कठोर कारवाई करण्याची होतेय मागणी 

शिरपूर : नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करतांना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाºया करामधून सूट मिळते़ मात्र बरेच व्यावसायिक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली़ सद्यस्थितीत तालुक्यात कृषीच्या नावावर उचल केलेले शेकडो ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याची बाब पुढे आली आहे़ यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे़शासन शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे़ यासाठी विविध योजनांचा माध्यमातून शेतकºयांना सवलत दिली जात आहे़ याचा शेतकºयांना लाभ होत आहे़ मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकºयांच्या नावावर इतर लोक घेत आहेत़ तालुक्यात बहुतांशी शेतकºयांकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर आहेत तर काहींनी ट्रॅक्टरची व्यावसायिक कामासाठी उचल केली आहे़ नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजचे आहे़ या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतुद आहे़ शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणी सुध्दा रद्द करण्याची तरतुद आहे़ मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत आहे़ यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेती माफियांचा सर्वाधिक समावेश आहे़ या प्रकारामुळे शासनाला कर स्वरूपात प्राप्त होणारा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे़ हा प्रकार मागील ४-५ वर्षापासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही़

वाळू प्रकरणी पकडलेल्या ट्रॅक्टरद्वारे बाब उघड

*रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही़ नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग करीत आहे़ शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे़*कृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केला जात असल्याची बाब महसून विभागाने रेतीची अवैध वाहतूक करतांना पकडलेल्या ट्रॅक्टरवरून उघडकीस आली़ पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात सदर ट्रॅक्टरची नोंदणी ही कृषी कामासाठी केली असून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात असल्याची बाब पुढे आली़ त्यामुळे नियमानुसार या ट्रॅक्टरवर १० पट दंड आकारण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे