राष्ट्रीय मतदार दिवसाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम नवीन नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे २५ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक पेजवरूनदेखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर साजरा करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना भारत निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या मतदार छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे निमित्ताने ऑनलाइन प्रश्नमंजूषा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी या लिंकचा उपयोग करून प्रथम संपूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेल (असल्यास) माहिती भरावी त्यानंतर प्रश्नपत्रिका निदर्शनास येईल. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्याचा अंतिम ३१ जानेवारी आहे. या प्रश्नमंजूषा परीक्षेमध्ये सर्व प्रथम सहभागी होऊन सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन (३) स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन गैरविण्यात येणार आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ११ वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करावा तसेच राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून युवा वर्गांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यादव यांनी केले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त धुळ्यात आज कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST