गावातील स्मशानभूमीत निंब, वड, शिसम, उंबर इत्यादी झाडे लावली. तसेच त्या सर्व झाडांच्या सुरक्षेसाठी कुंपण करण्यात आले. लावलेली सर्व झाडे जगवण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक सदस्याने जबाबदारी देखील घेतली आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना तरुणांनी सांगितले की, आज माणसाला, प्राण्यांना जगण्यासाठी एक प्रदूषणमुक्त आणि हवेशीर वातावरण हवे आहे. काेरोनाचा संसर्ग आणि नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवनासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे, याचे महत्त्व आता सर्वांनाच पटले आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर वनांचे संरक्षण, वृक्षांचे संवर्धन आणि वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी रुपेश बच्छाव, आकाश देवरे, राहुल देवरे, शुभम दहिते, मोहन देवरे, गणेश सावंत, विरल बागुल, कृपाल शिंदे, गोकुळ पवार, भूषण घोडसे, अमोल दहिते, गोलू देवरे, दिग्विजय ठाकरे यांनी मेहनत घेतली.