धुळे : शहरातील आग्रा रोडवर बेशिस्त पार्किं गमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले असल्याचे वारंवार प्रतिबिंबीत होत आहे़ याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो़ या पार्श्वभूमीवर आग्रा रोडवर पार्किंग व्यवस्था सुलभ करण्याची आवश्यकता आहे़ सर्वात वर्दळीचा असलेल्या आग्रा रोडवर आजही सर्वांचीच मदार आहे़ या ठिकाणी सर्वाधिक विक्रेत्यांसह मुख्य पाच कंदिल आणि व्यापारी बाजारपेठ आहे़ पंचक्रोषीतून नागरीकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसभर वर्दळ असते़ शिवाय मुख्य बाजारपेठ याच रस्त्यावर असल्यामुळे खरेदीसाठी नागरीकांचा वावर याठिकाणी असतो़ परिणामी वाहनधारकांकडून वाहनांची पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असते़ ही पार्किंग शिस्तीत झाली तर काही समस्या उदभणार नाही़ पण, हीच पार्किंग सध्या बेशिस्तपणे होत असल्यामुळे त्साचा परिणाम हा याच रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो़ ही समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्यामुळे कदाचित भविष्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचा धोका संभवतो आहे़ या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने या गंभीर अशा बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे़ शिवाय, हंगामी व्यावसायिकांचा देखील याच रस्त्यावर वावर सध्या वाढलेला दिसतो़ आग्रा रोडवर होणारी बेशिस्त पार्किंगची समस्या सुटण्याची गरज आहे़
व्यापाºयांच्या प्रतिक्रिया :-
आग्रा रोडवर वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे़ परिणामी पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ - किशोर डियालानीआग्रारोड सध्या वर्दळीचा मुख्य ठिकाण बनले आहे़ सर्वांचा ओढा याठिकाणी असल्यामुळे समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे़ - निखील बडगुजरआग्रा रोडवर वाहतूक समस्या वेळीच सुटणे आवश्यक आहे़ त्यासाठी महापालिकेने वेळीच नियोजन केल्यास हे सर्व शक्य आहे़ - सुनील चितोडकरआग्रा रोडवर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने पार्किंगची समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे़ पार्किंगचे नियम आणि त्याची अंमलबजावणी करावी़ - किशोर बारी