धुळे : आंबे खरेदी करण्याच्या ठिकाणी गर्दी झाल्याने गर्दी करु नका असे सांगितल्याचा राग आल्याने एका कुटुंबातील तिघांना जमावाकडून मारहाण झाली़ ही घटना शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावात शनिवारी दुपारी ३ वाजता घडली़ याप्रकरणी १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावी घरासमोर आंबे खरेदी करताना गर्दी झाली होती़ गर्दी करु नका असे सांगितल्याचा राग आल्याने जमावाने वाद घालण्यास सुरुवात केली़ शिवीगाळ करीत दमदाटी केली़ जीवे ठार मारण्याची धमकीही दिली़ यातील एकाने काठीने मारहाण केल्याने डोक्याला दुखापत झाली आहे़ या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता़याप्रकरणी भरत दशरथ तिरमले (३१) या तरुणाने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, रत्नदीप राजेंद्र तिरमले, दीपक राजेंद्र तिरमले, राजेंद्र पंडीत तिरमले, समाधान राजेंद्र तिरमले, रविंद्र बाबुलाल तिरमले, गोविंद बाबुलाल तिरमले, सौरभ संतोष तिरमले, आशाबाई राजेंद्र तिरमले, राणी दीपक तिरमले, उषाबाई गोविंद तिरमले, जिजाबाई संतोष तिरमले, दिपाली राजेंद्र तिरमले (सर्व रा़ विखुर्ले ता़ शिंदखेडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस नाईक साळुंके घटनेचा तपास करीत आहेत़
कुटुंबातील तिघांना जमावाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 20:55 IST