शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

चोपडाजवळ अपघातात ३ ठार, १ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 12:12 IST

शिरपूर : इंडिका गाडी कंटनेरमध्ये अडकल्याने गाडीचा चक्काचूर

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर-चोपडा मार्गावरील काजीपूरा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाºया इंडिका गाडीने समोरून जाणाºया कंटनेरवर धडकल्याने इंडिका गाडीचा चक्काचूर होवून ३ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर दुखापती झाल्यामुळे अधिक उपचारासाठी चोपडा येथून हलवून जळगांव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: धडक एवढी जबरदस्त होती की, इंडिका गाडी पूर्णत: कंटनेरमध्ये अडकून पडल्यामुळे जेसीबी मशिनने बाहेर काढण्यात आले़रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर शिरपूर रस्त्यावरील काजीपूरा फाट्यानजिक हा अपघात झाला़ इंडिका (क्रमांक एम़एच़१४-सीएक्स-९०१३^) गाडीत नामदेव गुलाब कोळी (४२) रा़मांजरोद, अनिल दशरथ जाधव  (२२) रा़बभळाज, किशोर गजानन बिºहाडे (३८) रा़भाटपुरा व सागर नरेंद्र पाटील (२२) रा़अजनाड असे चौघे जण येत होते़ चालक अनिल जाधव हा गाडी भरधाव वेगाने चालवित असतांना झोपेची डुलकी आल्यामुळे समोरून येणारा कंटनेरवर (गाडी क्रमांक एचआर-५५-एन-४११०) जावून धडकला़ अपघात एवढा जबरदस्त होता की, इंडिका गाडी चक्क कंटनेरच्या पुढील भागात चक्काचूर होवून पूर्णत: दाबली गेली़ त्यामुळे गाडीतील नामदेव गुलाब कोळी रा़मांजरोद, अनिल दशरथ जाधव रा़बभळाज व किशोर गजानन बिºहाडे रा़भाटपुरा हे तिघे जण दाबले गेल्यामुळे जागीच ठार झालेत़ घटना घडताच कंटनेर चालक फरार झाला़ काही वेळानंतर ये-जा करणाºया वाहनांनी जवळील हॉटेल चालकांना अपघात झाल्याचे वृत्त सांगितल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली़ तोपर्यंत अपघातातील मयत इंडिका गाडीतच अडकून पडले होते़ जेसीबी मशिन आणून कंटनेर लावून इंडिगा बाहेर काढल्यानंतर गाडीतील मयतांना बाहेर काढण्यात आले़ त्यात सागर नरेंद्र पाटील रा़अजनाड हा गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, प्रकृती चिंत्ताजनक असल्यामुळे त्यास लगेच जळगांव येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले़घटनेचे वृत्त मयतांच्या आप्तजणांना कळताच अनेकांनी घटनास्थळी व रूग्णालयात गर्दी केली़ इंडिगा गाडीतील चौघे जण हातेड येथे मित्रांकडे गेले होेते़ त्याठिकाणी रात्रभर ते मित्रांसोबत गप्पा-गोष्टींमध्ये जागे असावेत़ त्यामुळे पहाटे त्यांना गाडी चालविताना डुलकी लागली असावी आणि यातून हा अपघात घडला असावा अशी घटनास्थळी चर्चा होती़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात