शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे उपनिबंधकासह तीन जखमी, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 19:05 IST

गोराणे फाटा : कंटेनर अपघात, कार चक्काचूर

ठळक मुद्देगोराणे फाटा ता़ शिंदखेडा येथे घडला अपघातकंटेनरमुळे कारचा चक्काचूर झाला़अपघातात चालकाचा जागेवरच अंत, तीन अधिकारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने कारला जोरदार धडक दिली़ या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य एक जण असे तीन अधिकारी जखमी झाले़ कार चालक मात्र जागेवरच गतप्राण झाला़ जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ रुग्णालयाबाहेर हितचिंतकांनी गर्दी केली होती़शिंदखेडा येथील देखरेख संघाच्या हॉलमध्ये कर्जमाफी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत जिल्हा उपनिबंधक जे़ के़ ठाकूर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी, जिल्हा विशेष लेखा परिक्षक पी़ एस़ पाटील यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटी, बँक, लेखा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय अशा विविध विभागातील अधिकाºयांची बैठक होती़ बैठकीचे कामकाज आटोपल्यानंतर एमएच १८ बीसी ७८९२ क्रमांकाच्या कारने ठाकूर, चौधरी आणि पाटील हे तिघे धुळ्याकडे रवाना झाले़ दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार गोराणे ता़ शिंदखेडा येथील फाट्यावर आली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे़ त्यावेळेस कार महामार्गावर आली असता समोरुन एमएच १५ डीके १७७३ क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली़ ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाल्याने चालक भटू बागूल (रा़ वाडीभोकर ता़ धुळे) हा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली़ योगायोगाने अपघात स्थळापासून जवळच रुग्णवाहिका असल्याने जखमींना तातडीने धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ कंटेनर चालक घटनास्थळावरुन ट्रक सोडून पळून गेला़