शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

Vidhan Sabha 2019 : हजारोंच्या साक्षीने कुणाल पाटील यांची उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 22:45 IST

रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले : जेलरोडवर झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी केले मार्गदर्शन

धुळे : कार्यकर्ते, मतदार, तरूणांचा प्रचंड उत्साह, घोषणा तसेच ढोल ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत विराट जनसमुदायाच्या साक्षीने आमदार कुणाल पाटील यांनी धुळे विधानसभा मतदार संघातून कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. धुळे तालुका हे माझे कुटुंब असून, तुमच्यासाठी अहोरात्र काम करेल. वेळ आली तर तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असे अभिवचन आमदार पाटील यांनी यावेळी दिले.कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी १० वाजता देवपुरातील एस.एस.व्ही.पी. एस. महाविद्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅली जेल रोडवर आल्यावर तेथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.यावेळी मान्यवरांसह स्वत: आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सभेला माजी मंत्री रोहीदास पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे, माजी सभापती मधुकर गर्दे, विनय पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, प्रमोद जैन, कृउबाचे माजी सभापती गुलाबराव कोतकर, शिवाजी पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, गुलाबराव पाटील, भगवान गर्दे, चेअरमन लहू पाटील, विजय पाटील, शांताराम भिल, कृउबाचे उपसभापती रितेश पाटील, माजी पं.स. सदस्य अविनाश महाजन, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, भानुदास माळी, जगन्नाथ जाधव, गायत्री जयस्वाल, डॉ. दरबारसिंग गिरासे, वसंत पाटील, माजी पं.स.सदस्य वाल्मीक वाघ, अशोक सुडके, कृष्णकांत माळी, सरपंच किरण पवार, भटू चौधरी, छोटू चौधरी, सरपंच धनराज महाले, गुणवंत वाघ, दिनेश पाटील, शिरीष सोनवणे, हसन पठाण, यांच्यासह तालुक्यातील ग्रा.प.सदस्य, पं.स., जि.प.सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे