लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या आजाराचे रूग्ण केरळमध्ये आढळून आले आहे़ त्यामुळे या आजाराविषयची भिती नागरिकांच्या मनात आहे़ कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण अद्याप जिल्ह्यात नसल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.पी.सांगळे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.कोरोनाचे विषाणू अतिशय वेगाने पसरणारे व प्राणघातक असतात. कोरोनाचे विषाणू प्राणिजन्य असून ते प्राण्यापासून माणसात पसरतात व संक्रमीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला तात्काळ या प्राणघातक विषाणूची लागण होते. डुक्कर, वटवाघूळ, उंट,कुत्रा आदी प्राण्यांपासून कोरोनाचे विषाणू संक्रमित झाले आहेत.पर्यटकांची तपासणीकोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली आहे. सुदैवाने महाराष्ट्रात या आजाराचा एकही बाधित रुग्ण नाही. आजाराचा राज्यात शिरकाव होऊ नये, यासाठी परदेशातून येणाऱ्या व्यक्ती, पर्यटकांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी केली जात आहे़ तर चीन मधून येणाºया पर्यटकांची मुंबई व पुणे विमानतळावर तपासणी केली जात आहे. याठिकाणी पर्यटकांचे दोन वेळा रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यांनतर पुणे येथील व्हायरस सेंटर मध्ये रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. कोरोना बाधित रुग्ण आढळले तर त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात व पुण्यातील नायडू रुग्णालयात संसर्गजन्य रोगापासून दूर असेपर्यंत वेगळे ठेवले जाईल. संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात देखरेखी खाली ठेवण्यात येत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली़अशी घ्यावी दक्षताकोरोनाबाधित रुग्णाला प्रचंड सर्दी होते. ताप व शिंका येतात. तसेच घसा खवखवतो व खोकला येतो. लहान मुलांना निमोनिया होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाºया लोकांना लवकर लागण होते. शीतपेये, आईस्क्रीम, कुल्फी आदींचे सेवन करू नये, बंद डब्यातील भोजन, जुनाट बर्फगोळा, सीलबंद दूध यांचे सेवन करू नये, हात साबणाने धुतले पाहिजेत, घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, प्राण्यांचे मास खाणे टाळावे.जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी घाबरून न जात खबरदारीचे उपाय करावे.-डॉ़एम़पी,सांगळे,जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:06 IST