शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक औषधांशिवाय पर्याय नाही - धुळ्यातील चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 17:48 IST

राज्यस्तरीय : आयएमए व अंनिसतर्फे आयोजन, बुवाबाजीला विरोध

ठळक मुद्देधुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रआयएमए आणि अंनिसचा पुढाकारबुवाबाजीवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिवसेंदिवस बुवाबाजीचे प्रकार वाढत आहे़ त्याला कडाडून विरोध करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुढे सरसावली असताना आयएमएने देखील पुढाकार घेतला आहे़ वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पध्दती आणि औषधांमुळे रुग्णांना निश्चित फायदा होत आहे़ भोळ्या लोकांना लुबाडण्याचा प्रकार थांबवायला हवा असा सूर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या राज्यस्तरीय चर्चासत्रातून रविवारी निघाला़  इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आयएमए सभागृहात ‘वैद्यकीय क्षेत्रातील फसव्या उपचार पद्धती व शोषण विरोधी भूमिका’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले़ यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, डॉ रवींद्रनाथ टोणगावकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अ‍ॅड़ जे. टी. देसले, डॉ़ सुरेश वसईकर, डॉ़ सुरेश बिºहाडे, सुरेश थोरात, प्रा़ दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते़ डॉ़ वानखेडकर म्हणाले, भारतीय चिकित्सा पध्दतीला विरोध नाही़ शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे त्याचा अंमल झाला पाहीजे़ आजच्या स्थितीत तावून सलाखून डॉक्टर होत असताना दुसरीकडे मात्र अल्पावधीचे कोर्स घेऊन डॉक्टर तयार होत असल्याचा धोकाही त्यांनी दर्शविला़ आरोग्याचे राष्ट्रीयकरण झाले पाहीजे़ शासनाने ही आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी स्विकारण्याची आवश्यकता आहे़ डॉ़ टोणगावकर म्हणाले, आजच्या स्थितीत फसवे विज्ञान वाढत असताना ते रोखण्याची जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे़ अंधश्रध्दा फोफावत असल्याने परिणामी ग्रामीण भागात मृत्यू दराची संख्या वाढत आहे़ ते रोखण्यासाठी आधुनिक उपचार पध्दती अंगिकारायल हवी़ ताणतणाव वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढत आहे़ मन आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे़ त्यामुळे सकारात्मकता बाळगावी आणि अंधश्रध्देपासून दूर रहावे असा सल्लाही त्यांनी दिला़ अविनाश पाटील यांनी वाढत असलेल्या अंधश्रध्देवर कडाडून टिका केली़ राज्यात अनेक ठिकाणी जावून चुकीचा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ काही ठिकाणी पोलिसात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत़ अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी जिल्हावार चर्चासत्र घेत असताना आता विभागीय पातळीवर घेण्याचे नियोजन आखण्यात येईल़ शिक्षणाप्रमाणे आरोग्याचे खासगीकरण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ चर्चासत्राचे सुत्रसंचालन दिनेश मोरे यांनी तर प्रास्ताविक डॉ़ सुरेश वसईकर यांनी केले़ चर्चासत्राला मान्यवर उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे