लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर-चोपडा मार्गावरील असली गावात एकाच दिवशी भुरट्या चोरट्यांनी ३ घरफोडी करून ऐवज लांबविला़ मात्र एकाठिकाणी घराबाहेर बांधलेला बोकड व बकरी सुध्दा लांबविल्याची घटना उघडकीस आली़५ रोजी पहाटे असली गावात ३ ठिकाणी वेगवेगळ्या घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्यात़ ४ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेबाहेर गावातील ग्रामस्थ गप्पा मारत असतांना अज्ञात चोरटे गावात शिरकाव करीत असतांना ग्रामस्थांनी त्यांना हटकले़ गावातील लोकांनी चोरट्यांना पळवून लावले, मात्र ते चोरटे गावाजवळील नाल्यात उतरुन लपून बसलेत़ त्यांनी लोकांची दिशाभूल केल्यामुळे ग्रामस्थ तेथून निघून गेलेत़ ही संधी साधत त्यांनी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावातील घरे फोडलीत़असली येथील अल्केश कोळी यांच्या घरात घुसून चांदीच्या वस्तु, कपड्यांची पेटी, बॅग व ४-५ रूपये हजार रोख घेऊन ते पसार झालेत़ मात्र चोरट्यांनी गावाच्या लगत असलेल्या एका कापसाच्या शेतात अस्थाव्यस्त फेकलेले कपडे व सामान दिसून आला़साहेबराव धनगर यांच्या घराची भींत फोडून चोरटे प्रवेश करीत असतांना घरातील धनगर परिवाराला आवाज आल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला़ त्यामुळे त्याठिकाणी चोरी करता आली नाही़ तसेच रोहिदास कोळी यांच्या घराशेजारी दुकानाच्या सेटरला बांधलेली बकरी व बोकड चोरट्यांनी चोरून नेलेत़ एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी झाल्यामुळे गावात खळबळ माजली़थाळनेर पोलिस स्टेशनचे बिट हवालदार पारधी घटनास्थळी दाखल झालेत़ पोलिस पाटील जितेंद्र कोळी, किरण कोळी, अल्केश कोळी आदींनी चोरी झालेल्या घटनास्थळाची पहाणी केली़ एकाच दिवशी तीन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गावात खळबळ उडालेली आहे.
असली गावात तीन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:19 IST