शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धमाने ग्रामपंचायतीला सरपंचासह सदस्यांनी ठोकले ताळे, ग्रामसेवक येत नसल्याने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:53 IST

धमाने ग्रामपंचायतमध्ये भगवान राजपूत हे ग्रामसेवक आहेत. गेल्या एक महिनाभरापासून ते ग्रामपंचायतीत येत नाहीत.

धुळे : तालुक्यातील धमाने येथील  ग्रामपंचायतीत गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक येत नसल्याने, संतप्त झालेल्या सरपंच, व सदस्यांनी ग्रामपंचायतीला बुधवारी सायंकाळी टाळे ठोकले. दरम्यान सायंकाळी उशीरा आलेल्या ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत घेण्यास सरपंचसह सदस्यांनी विरोध केला. ग्रामसेवकावर कारवाई केल्यानंतरच कुलूप उघडले जाईल असा पवित्रा घेतला आहे.

धमाने ग्रामपंचायतमध्ये भगवान राजपूत हे ग्रामसेवक आहेत. गेल्या एक महिनाभरापासून ते ग्रामपंचायतीत येत नाहीत. गावात येत नाहीत. त्यामुळे  ग्रामस्थांच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते..या संदर्भात बुधवारी  सरपंच मीनाबाई ठाकरे यांच्यासह सदस्यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदन दिले व ग्रामसेवकाबाबततक्रार केल्या.

सीईओंना निवेदन देताच बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास   ग्रामविस्तार अधिकारी भीमराव गरुड व ग्रामसेवक भगवान राजपूत हे ग्रामपंचायत आले . त्यांनी ग्रामपंचायतचे कुलूप उघडण्याची विनंती केली..मात्र सरपंच  मीनाबाई ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास व चर्चा नकार दिला .जोपर्यंत ग्रामसेवक का येत नव्हते याची कारणे विचारा, त्यांच्यावर कारवाई करा, मगच आम्ही चर्चेस सामोरे जाऊ असा पवित्र घेतला. 

टॅग्स :Dhuleधुळे