शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात राम जन्मोत्सवासाठी मंदिरे सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:50 IST

अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

ठळक मुद्देशहरातील मंदिरांमध्ये आकर्षक सजावटरविवारी दुपारी साजरा होणार जन्मोत्सवभाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  रामनवमी निमित्त रविवार  २५ मार्च रोजी शहरातील विविध मंदिरांमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार  आहे. त्यानिमित्त सर्वच श्रीराम मंदिरांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.  यंदाही तेथे पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या निमित्त राम मंदिरांसह अन्य मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उत्सवमूर्तींना सजविण्यात आले आहे.आग्रारोडवरील राममंदिर जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास सुमारे अनेक वर्षांची परंपरा  आहे. येथे गुढीपाडवा ते राम नवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वाजता सिद्धेश्वर भजनी मंडळ व सर्वसमावेशक भजनी मंडळाचा कार्यक्रम होत आहे. रामनवमीच्या दिवशी सकाळी १०.३० वाजेपासून श्रीराम जन्मापर्यंत संजय कुळकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता बाळासाहेब कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ डॉ. अभय व भाग्यश्री कुळकर्णी यांच्यातर्फे पवन शर्मा व सहकारी यांचा सुंदरकांड गायनाचा कार्यक्रम होईल.रात्री ९ वाजेपासून रामदेवबाबा भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. उपस्थितीचे आवाहन मंदिराचे ट्रस्टी प्रमोद मोराणकर, अभय नाशिककर, सुभाष कांकरिया, विजय पाच्छापुरकर, प्रशांत विसपुते, हर्षवर्धन बेलपाठक, भाग्यश्री कुळकर्णी यांनी केले आहे.सुभाषनगरातील राममंदिरजुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा होणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत विविध धार्मिक कार्यक्रम व १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. या मंदिरास १३० वर्षांची परंपरा लाभली असल्याची माहिती चंद्रकांत केले यांनी दिली. 

टॅग्स :Dhuleधुळे