शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

शिरपुरच्या तहसीलदारांनी सिनेस्टाईलने खाजगी वाहनातून पाठलाग करुन पकडले वाळूचे दोन ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली . गुरुवारी दुपारी खाजगी वाहनाने सिनेस्टाईलने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला आणि दोन वाळूचे ट्रॅक्टर पकडले.शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन आणि वाळू चोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी गेल्या महिन्यात पाठलाग करुन वाळू चोरी करणारे वाहन पकडले होते. त्यांच्या या कारवाई नंतर आबा महाजन यांच्या हालचालीवर वाळू माफियांनी बारीक नजर ठेवत होते. त्यामुळे आबा महाजन यांना वाळू चोरी पकडण्यात अडचण होती. म्हणून तहसीलदारांनी गुरुवारी दुपारी स्वत:चे शासकीय वाहन न वापरता खाजगी वाहनाद्वारे वाळू माफियांवर पाळत ठेऊन होते. गुरुवारी दुपारी त्यांनी खाजगी वाहनाद्वारे पाठलाग करुन दोन ट्रॅक्टर पकडले, त्यानंतर सदर वाहन हाती लागले असून तसेच सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव चेतन कैलास मराठे,राकेश सुदाम कोळी यांचे असून विना नंबरचे ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या पथकाने भरलेल्या रेतीसह ट्रॅक्टर पकडले.याप्रसंगी मंडळ अधिकारी प्रशांत ढोले,तलाठी गुरुदास सोनवणे,ज्ञानेश्वर बोरसे,वाहन चालक सतीश पाटोळे होते.या कारवाईमुळे अनेक अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.तहसीलदार आबा महाजन यांनी केलेल्या कारवाईमूळे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.